ब्रेकिंग !! अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, कोणत्या प्रकरणात झाली अटक ?

724 27

मुंबई- महाविकास आघाडीमधील एकेक मंत्र्यावर, नेत्यांवर इडीची कारवाई झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा नंबर लागला आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदी केल्या प्रकरणी नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे.

ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. त्यानंतर मलिक यांना ईडीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटाही वाढवण्यात आलेला आहे.

इकबाल कासकर, इकबास मिरची, आणि अस्लम फ्रूट यांना ईडीनं ताब्यात घेतलं होतं. इकबाल कासकरनं ईडी चौकशीत मलिक यांचं नाव घेतल्याचं बोललं जातंय. त्यानंतर ईडीनं कारवाई करत मलिकांची चौकशी सुरु केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. दरम्यान, नवाब मलिकांनी 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदीचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

फडणवीस यांनी काय आरोप केले ?

– 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
– कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
– 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
– मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
– 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25रु. स्वेअर फुटांनी केली.
– जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!