शाब्बास भावा! अपघातात एक हात, दोन्ही पाय गमावले पण….

3595 0

मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली की कितीही संकट आली तरी त्यावर मात करता येते अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ज्याने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 मध्ये दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे नसतानाही एका तरुणाने घवघवीत यश मिळवलं आहे.

मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सूरज तिवारीने नेत्रदिपक कामगिरी केली आहे. त्याचा एक भीषण अपघात झाला अन् क्षणात सर्व गोष्टी बदलल्या. खूप काही गमवावं लागलं, पण असं असताना देखील सूरजने जीवनात हार न मानता जीवनाशी लढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अपघातात सूरजला त्याचे दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे गमवावी लागली होती.

सूरज तिवारीने 917 वा रँक मिळवला

सूरज या अपघातामुळे थोडा खचला पण त्याने हार मानली नाही. आज ही वाईट घटना विसरून त्याने देशातील सर्वात कठीण UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Share This News
error: Content is protected !!