आझाद मैदानावर संभाजी राजे छत्रपती 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसणार पुणे जिल्ह्यातून पाठिंब्यासाठी हजारो बांधव जाणार – राजेंद्र कोंढरे (व्हिडिओ)

690 0

17 जून 2021 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्री गणा सोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला होता आम्ही दीड महिन्याचा वेळ दिला .मात्र आज आठ महिने उलटले तरी अद्याप समाजाच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

यामुळे समाजाला न्याय मिळावा यासाठी 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथून खासदार संभाजीराजे आमरण उपोषणास बसणार आहे.

पुणे शहर जिल्ह्यातून पाठिंब्यासाठी हजारो बांधव जाणार आहेत. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मराठी क्रांती मोर्चा चे नाना निवंगुणे ,अमर पवार, बाळासाहेब जगदाळे उपस्थित होते.
राजेंद्र कोंढरे म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही   हातात तलवार घेऊन वार कोणावर करणार? असे वादग्रस्त विधान करून स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दोन समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे वडेट्टीवार यांच्या विधानाचा मराठी क्रांती मोर्चा निषेध करीत आहे.

नाना निवंगुणे म्हणाले, अगोदर राज्य शासनाने मराठा आरक्षण ओबीसी राजकीय आरक्षण कोर्टात बाद केलेले आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी खर तर या दोन्ही गोष्टी आरक्षणातील निकालात सर्वोच्च न्यायालयाने आदेश आतील बाबीची मलमपट्टी न करता त्यातील त्रुटी दुरुस्त करण्याच्या जबाबदारीतून पळ काढून
आझाद मैदानावरील आंदोलनाकडे लक्ष वेधून आपली जबाबदारी टाळत आहेत असे निवंगुणे म्हणाले.
मराठी क्रांती मोर्चा समन्वयक यांनी केलेले उपस्थित प्रश्न
कोपर्डी खून खटल्याची मुंबई उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी घ्यावी यासाठी शासन उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर न्यायालयात विनंती करणार आहे असे मीटिंगमध्ये सांगितले होते.

त्यावर काय कारवाई झालेली नाही .एवढी उदानसीता या महत्त्वाच्या खटल्यात असेल तर
न्याय कसा मिळणार आहे? उच्च न्यायालयात प्रलंबित चर्चा खटला त्वरित चालवावा . , मराठा समाजाच्या तरुणासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहात तात्काळ सुरू करणे बाबत शासनाने उद्घाटन करण्याचे जाहीर केले होते .त्यापैकी ठाणे येथील अपवाद वगळता कोणते वसतीगृह सुरू झालेले नाही.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide