अष्टविनायका तुझा महिमा कसा; अष्टविनायक यात्रा आता 2 दिवसात नाही तर 1 दिवसात करता येणार

3745 0

महाराष्ट्रातली प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अष्टविनायक एक आहे. आता अष्टविनायकाची यात्रा 24 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. ही सर्व स्थळं एकमेकांना जोडणाऱ्या 252 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेले काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

अष्टविनायकाची ही स्वयंभू गणपतींची आठ मंदिरं प्रेक्षणीय असून राज्यासह परराज्यातून तसच देश विदेशातून येणाऱ्या भाविकांच प्रमुख आकर्षण आहे. परंतु अष्टविनायकाच्या दर्शनादरम्यान मार्गांवरील अडथळ्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांचा हा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा या हेतूने सार्वजनिक बांधकाम विभागाने अष्टविनायकांच्या स्थळांना जोडणाऱ्या 252 किलोमीटर रस्त्यांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी सुमारे 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अष्टविनायकांचा संपूर्ण मार्ग 654 किलोमीटरचा आहे. अष्टविनायकांचे स्थान आणि त्यासाठी असलेला प्रकल्प कसा आहे पाहुयात

 

मोरेश्वर – मोरगाव
चिंतामणी – थेऊर
गिरिजात्मक – लेण्याद्री
विघ्नेश्वर – ओझर
महागणपती – रांजणगाव

ही पाच गणपतीची मंदिरं पुणे जिल्ह्यात आहेत

सिध्देश्वर – सिध्दटेक नगर जिल्ह्यात

बल्लाळेश्वर – पाली
वरदविनायक – महाड
ही दोन मंदिरं रायगड जिल्ह्यात आहेत

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गात सुधारणा सुरू असताना पीडब्ल्यूडीने या मार्गावरील 252 किलोमीटरचे जाळे जोडण्यास सुरुवात केली आहे

अष्टविनायकाच्या सर्व मंदिरांचे मार्ग जोडण्यास सुरुवात केली असल्याने भाविकांचा प्रवास सोपा होणार आहे. आता 24 तासांत आणि जलदगतीने प्रवास करून दर्शन घेता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!