शरद पवारांच्या राजीनाम्याचे राष्ट्रवादीत पडसाद; जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

573 0

मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता पहायला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार यांनी निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!