महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचं निधन; वयाच्या 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

1084 0

लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी नंतर त्यांच्या आजोबांचा मार्ग अवलंबला आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम केले.

Share This News
error: Content is protected !!