राज्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनं बदल्या

650 0

राज्यातील 11 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर पदोन्नतीने बदली  करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी मंगळवारी (दि.25) याबाबचे आदेश काढले आहेत.

 

अशा आहेत बदल्या…

सुरेश कुमार मेकला यांची अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

राजकुमार व्हटकर यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. राजेश कुमार यांना संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथेच पदोन्नती देण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

संजय सक्सेना प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

अनुप कुमार सिंह यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, मंत्रालय येथे बदली करण्यात आली आहे.

निखिल गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

रविंद्र सिंगल यांची अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

सुखविंदर सिंह यांची अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

तर एस टी राठोड यांची पोलीस उप आयुक्त, बृहनमुंबई येथून अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!