कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज पाटील गटाचे सचिन पाटील यांचा ३९ मतांनी पराभव केला.
राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतमोजणी होत असून या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.