धक्कादायक! प्रियसीनं लग्नाला दिला नकार; प्रियकरानं केलं असं कृत्य

994 0

प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे घडली आहे. ही घटना सहा एप्रिल रोजी घडली असून, उपचारादरम्यान सव्वा वर्षीय बाळाचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी विक्रम शरद कोळेकर (रा. कोयाळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने शनिवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीला 24 तासांत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे अनैतिक संबंध होते. त्यातून आरोपीने फिर्यादी यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पाय गंभीरपणे भाजली गेली. भाजलेल्या ठिकाणची कातडी जळून गेल्याने उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!