पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

3481 0

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे. त्यामुळे या योगायोगाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.

भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मयुरी आमले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी मयुरी अभिलाष आमले यांना सरपंच म्हणून घोषित केले. निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक भुकूम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत काढण्यात आली. भूकूम गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सख्खे मावस बहीण आणि भाऊ सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झाले असल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. उपसरपंच पदी अंकुश खाटपे यांची अगोदरच निवड झाली होती.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide