मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

536 0

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल शनिवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण आला.

18 मार्चपासून अमृतपाल सिंग फरार होता. अमृतपाल सिंग याने त्याची संघटना ‘वारीस पंजाब दे’च्या सदस्यांसह पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र अमृतपाल सिंग फरार झाला होता. वेषांतर करत तो पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!