नवले पुलावर पुन्हा अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू तर 22 जण गंभीर जखमी

8869 0

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!