पुण्यातील खराडी परिसरात असणाऱ्या साईनाथनगर येथील एका गोडाउनमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून 7 वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गोडाऊनमधे थिनर व पेंट असल्यामुळे आगीने रुद्र रूप केले. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलातील जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे.
दरम्यान या घटनेत सुदैवानं कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही