चोरीच्या उद्देशानं गेले आणि झालं भलतचं; नागपुरात भर दिवसा एका रिक्षाचालकाचा….
नागपूर: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून सीताबर्डी येथील हॉटेल गुजरात येथील हनुमानगल्लीत एका ऑटोचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.
राजकुमार यादव (वय ४५, रा. लष्करीबाग, भोसलेवाडी) असे मृतक ऑटोचालकाचे नाव असून साहील आनंद राऊत (वय २० रा. आनंदनगर, सीताबर्डी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास तो तिथे उभा असताना, त्याने तिथून जाणाऱ्या साहिल राऊत याला शिविगाळ केली.
आरोपी साहिल राऊतने राजकुमार याची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
