कथित भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंना मोठा धक्का; खडसेंचे जावई

774 0

राज्याच्या राजकारणातील एकेकाळचे हेवीवेट नेते एकनाथ खडसे यांना पुण्यातील कथित भोसरी भूखंड घोटाळ्यात अडचणीत आल्यानंतर महसूलमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान आता या प्रकरणी माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा मोठा धक्का बसला बसला असून भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे  यांचे जावई गिरीश चौधरी यांना उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळून लावली आहे.

यावेळी न्यायालयानं खडसे यांच्यावर देखील ताशेरे ओढत यावेळी  खडसे यांनी महसुलमंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याची टीप्पणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर ६ जुलै २०२१ रोजी अटक केली होती. तेव्हापासून चौधरी कोठडीत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!