लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनलाही टाकलं मागे; तब्बल इतक्या लोकसंख्येसह भारत बनला सर्वाधिक लोकसंख्येचा देश

1815 0

भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारत 142.86 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे आणि चीन दुसर्या क्रमांकावर घसरला आहे.

संयुक्त राष्ट्राने बुधवारी सकाळी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील आकडेवारीनुसार भारत या वर्षाच्या मध्यापर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. त्यावेळी भारताची लोकसंख्या चीनपेक्षा ३० लाख जास्त असण्याचा अंदाज वर्तविला आहे.

भारत, ब्राझील, इजिप्त, फ्रान्स, हंगेरी, जपान, नायजेरिया आणि युनायटेड स्टेट्स या आठ देशांतील 7,797 लोकांना लोकसंख्येच्या मुद्द्यांवर त्यांचं मत ऑनलाइन विचारण्यात आलं. भारतातून 1,007 चं सर्वेक्षण ऑनलाइन करण्यात आलं. लोकसंख्येशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या बाबी ओळखताना 63 टक्के भारतीयांनी लोकसंख्येतील बदलाचा विचार करताना विविध आर्थिक समस्यांना प्रमुख चिंता म्हणून ओळखलं. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि प्रजनन दर खूप जास्त आहे.

Share This News
error: Content is protected !!