Breaking News
Crime

मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात केली बंदुकीनं फायरिंग; तीन तरुणांवर गुन्हा दाखल

9680 0

मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात बंदुकीनं फायरिंग करणं तीन तरुणाच्या चांगलंच अंगलट असून याप्रकरणी तीन तरुणावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की तेजस गोंधळे (वय २९, रा. तेजदीप निवास, गोंधळेनगर, हडपसर.), अजिंक्य मोडक (वय ३४, रा. फुरसुंगी), चेतन मोरे (वय २४, रा. तुकाई दर्शन) यांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस, अजिंक्य आणि चेतन सिंहगड परिसरात फिरायला गेले होते. तेथून परतत असताना तिघे जण खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ थांबले. तेथे पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

गोळीबाराचा आवाज परिसरातील उपहारगृहचालक आणि नागरिकांनी ऐकला. त्यांनी हवेली पोलिसांना या घटनेची माहिती दिली व त्यानंतर हवेली पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!