अजित डोभाल यांच्या घरात घुसला अज्ञात व्यक्ती, रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा

277 0

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून त्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. नेमका हा व्यक्ती कोण आहे ? त्यानं नेमकं असं का केलं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

दिल्लीतील लोधी कॉलनीत असलेल्या स्पेशल सेलच्या ऑफिसात या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. आपल्याला रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा केला असून आपल्यावर चीप लावण्यात आली असल्याचंही या इसमानं म्हटलं. त्याची तपासणी केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारची चीप या व्यक्तीच्या शरीरावर आढळून आली नाही. ही व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुतील राहाणारा असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

कोण आहेत अजित डोभाल ?

अजित डोभाल हे 1972 सालचे आयबी अधिकारी आहेत. भारतीय गुप्तहेर म्हणून त्यांनी अनेक बड्या कारवाया केल्या आहेत. सात वर्ष ते पाकिस्तानमध्ये राहिले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू थंडर यात अजित डोभाल यांची महत्त्वाची भूमिका होती. 1999 साली झालेल्या विमान अपहरणावेळी अजित डोभाल यांना सरकारच्या वतीनं मुख्य वार्ताहर बनवण्यात आले होते.

Share This News
error: Content is protected !!