जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पुल कोसळला;80 जण गंभीर जखमी

1000 0

जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे बैन गावामध्ये उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 80 जण यामध्ये जखमी झाले आहेत

जम्मू-काश्मीरात बैसाखी उत्सवादरम्यान उधमपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उधमपूरच्या एका गावात बैसाखी उत्सव साजरा करण्यात येत होता. उत्सव साजरा करण्यासाठी अनेक भाविक या कार्यक्रमाला हजर झाले होते. याचवेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.

चेनानी महानगरपालिकेचे अध्यक्ष मानिक गुप्ता यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. मानिक गुप्ता म्हणाले, उधमपूर जिल्ह्यात झालेल्या या घटनेत 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर यापैकी सहा ते सात जणांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!