आजपर्यंत आपण कावळा हा काळा रंगाचा पाहिला असेल. मात्र आता पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये पांढरा कावळा पाहायला मिळाला.
एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे.
जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता कमी असल्याने हा प्रकार आढळतो असं तज्ञांचं मत आहे