राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोध्या दौऱ्यावर असून या आयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराची पाहणी केली.
यावेळी उत्तरप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देव सिंग , महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
त्याच बरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजीमंत्री रामदास कदम, आनंदराव अडसूळ, आमदार मंगेश चव्हाण, रामजन्मभूमी तीर्थस्थानचे महासचिव चंपत राय आणि अयोध्येतील महंत आणि मान्यवर देखील उपस्थित होते.