मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि काहे दिया परदेस फेम सायली संजीव रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आता याबाबत अभिनेत्री सायली संजीव हीनं मोठा खुलासा केला आहे.
बस बाई बस या कार्यक्रमात सुबोध भावेनं सायली संजीवला याबाबत प्रश्न विचारला असता सायलीनं अखेर रिलेशनशीप चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
याबाबत बोलताना सायली म्हणाली की ऋतुराज माझ्यापेक्षा वयानं लहान असून आम्ही खूप चांगले मित्र मित्र आहोत असं सायली संजीव म्हणाली