DEVENDRA FADANVIS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर

378 0

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आयोध्येच्या दिशेने रवाना झाले होते त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या आमदारांसह अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.

अयोध्येत ठिकठिकाणी दोन्ही नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते सुद्दा अयोध्येत दाखल होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अयोध्या हा आमचा आस्थेचा विषय आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येत जाणार असल्याने या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!