अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

896 0

अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलं आहे

2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे त्यासंदर्भात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!