उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मुख्य रस्त्यावर भीषण अपघात

258 0

उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मुख्य रस्त्यावर शेरगडीजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. या महामार्गावर एका बसचे नियंत्रण सुटून ती खड्ड्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आयटीबीपी, अग्निशमन दल, 108, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठविले आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला 19जखमींना डेहराडूनला पाठवण्यात आले आहे, तर काहींवर मसुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मसुरी-डेहराडून मार्गावर हा अपघात झाला. उत्तराखंड परिवहन महामंडळाच्या बसचे नियंत्रण सुटल्याने ती खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!