मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात धडाडणार ठाकरी तोफ; उद्धव ठाकरेंची आज मालेगावात जाहीर सभा

575 0

उद्धव ठाकरे यांची कोकणात सभा झाल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहे. रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा होणार आहे.

मालेगाव हा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. ठाकरे गटासाठी आजची सभा ही उत्तर महाराष्ट्राच्या अनुषंगाने महत्वाची असणार आहे.

नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या अद्वय हिरे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेत मोठी जबाबदारी देणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात त्यामुळे आता आजच्या सभेत उद्धव ठाकरे नेमका काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!