महिलांसाठी खुशखबर! आजपासून एसटीत मिळणार 50% सवलत

386 0

महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने १७ मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना

म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये राज्यातील सर्व महिला भगिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये 50% सवलत मिळणार असल्याची घोषणा केलेली होती. त्याची सुरुवात आज पासून होत आहे.

एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होईल. योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला मिळेल. त्यातून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide