पुणेब्रेकिंग न्यूज

पुणेकरांनो सावधान! हवेतील खराब श्रेणीत ही घ्या काळजी

पुणे: वाहतूक कोंडीमुळे आधीच पुणेकर त्रस्त असतांना आता त्यात प्रदूषणाची ही भर पडलीये. शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून ती खराब श्रेणीत पोहोचल्याचे दिसून येत आहे

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था सफरच्या नोंदणी नुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सध्या पुण्याच्या हवेची गुणवत्ता ही दिल्ली आणि अहमदाबादच्या हवेच्या गुणवत्तेपेक्षाही ढासळली असून पुण्यात पावसाने उघडीत दिल्याने, प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. त्यामध्ये अतिसूक्षम धुलीकरण आणि सूक्ष्मधुलिकरण घटकांचे प्रमाण वाढू लागलेत. त्यात शिवाजीनगर,आळंदी हडपसर या भागात खराब श्रेणींची नोंद झाली तर कोथरूड, निगडी,कात्रज आदी भागांमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असल्याचे अधोरेखित झाले

दिल्लीच्या तुलनेत पुण्याच्या हवेचा दर्जा हा खाली घसरलाय मात्र हा दर्जा खाली घसरण्यामागे काय कारण आहे.

शहरीकरणामुळे घटणारी वृक्षराजी, त्यामुळे तापमानातील वाढ

शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असलेले बांधकाम व इतर प्रकल्पांमुळे हवेतील सूक्ष्म धुलीकणांचे वाढते प्रमाण

वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे उत्सर्जन प्रदूषणवाढीस कारणीभूत

या खराब हवेमुळे अनेक आजार वाढीस लागताय. तर, या खराब हेवेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी बघुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून

दीर्घकाळ धुलिकणांच्या संपर्कात येण्यापासून बचाव करण्याकरिता मास्क वापरा

जड किंवा त्रास होतील अशी कामे टाळा

श्वसनाचा आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी

श्वास घेताना त्रास किंवा खोकला जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

वाऱ्यांचा वेग तुलनेने कमी झाला असून बांधकामातून निघणारे धुलीकरण हे हवेतच असल्याने प्रदूषणाची पातळी वाढली असून बांधकाम आणि वाहतूक कोंडी यामध्ये नियंत्रण आणल्यास नक्कीच प्रदूषणाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.