मोठी बातमी : माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंना ‘त्या’ प्रकरणावरून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

693 0

पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले याना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्यवार गुन्हा दाखल आहे. त्यामधे संजय काकडे हे आरोपी आहेत त्या प्रकरणी न्यायालयाने त्याना व त्यांची पत्नी उषा काकडे याना जामीन मंजूर केला होता सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना आरोपी संजय काकडे न्यायलंयीन कामकाज साठी एकदाही हजर न राहता गैरहजेरी माफी मिळण्या साठी अर्ज करत होते.

आज सदर प्रकरणाची सुनावणी वेळी संजय काकडे यांच्या वतीने पुन्हा गैरहजेरी माफी साठी अर्ज केला होता तसेच फिर्यादी यांनी संजय काकडे याना पकड वारंट काढण्याची विनंती अर्ज केला होता त्यावर सुनावणी घेऊन केवळ आज रोजी हजेरीची माफी देऊन आरोपी माजी खासदार संजय काकडे याना पुढील सुनावणीस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश श्री निमसे पुणे यांनी दिले.

नेमकं काय आहे प्रकरण

संजय काकडे यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले (वय, ४०) यांनी याबाबत काकडे यांच्याविरूध्द फिर्याद दिली होती. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक देखील झाली होती न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

काकडे दाम्पत्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणात उषा काकडे यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी अर्ज केला होता. सदरचा अर्ज न्यायालयानं फेटाळल्यानंतर उषा काकडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, फिर्यादी यांस नोटीस न बजावता व त्यांस त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता सत्र न्यायालयाने काकडे यांचा अर्ज मंजूर केला होता या , सदर आदेशाच्याविरुद्ध फिर्यादी युवराज ढमाले यांनी उच्च न्यायालयात त्यांचे वकिलांमार्फत धाव घेतली होती. या प्रकरणी मा उच्च न्यायालयानं प्रकरणाची दखल घेत उषा काकडे यांचा नाव वगळण्याचा निर्णयास स्थगित करून उषा काकडे यांस नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!