उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरे तोफ

780 0

रत्नागिरी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच आज र (विवार दि. 5 मार्च) रोजी खेड येथे येणार आहेत. खेडमधील गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

गोळीबार मैदानावरील शिवगर्जना मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून खेडमध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे. सायंकाळी पाच वाजता गोळीबार मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दणदणीत आणि खणखणीत जाहीर सभा होत आहे. सध्या राजकीय सत्तासंघर्ष सुरू असताना उध्दव ठाकरे कोकणातून जनतेशी संवाद साधायला सुरुवात करत आहेत. उद्या होणाऱ्या शिवगर्जना मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गोळीबार मैदानावर होणाऱ्या शिवगर्जना मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून शिवसैनिक मेळावा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!