उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याची अटक बेकायदा

646 0

पोलीस अधिका-यांनी वरिष्ठांच्या कायदाबाह्य आदेशांना नाही म्हणायला शिकायला हवं. शक्य नसेल तर किमान तश्या लेखी आदेशांची मागणी करावी. असं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळेला मोठा दिलासा दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे यांच्याविरुद्धच्या 2 FIR रद्द, चुकीच्या अटकेसाठी पोलीस अधिकाऱ्याकडून 25 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

कुदळे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम चार आठवड्यात संदीप कुदळे यांना देण्यात यावी तसेच

कुदळे यांच्यावर एफआयआर नोंद होण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीकडून वसूल केली जावी,असेही कोर्टाने आदेशात नमूद केले आहे.

Share This News
error: Content is protected !!