महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असून रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेमके कोण आहेत रमेश बैस आणि कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास पाहुयात…
रमेश बैस यांचा जन्म मध्यप्रदेशच्या रायपूरमध्ये झाला होता जो सध्या छत्तीसगडमध्ये आहे. बैस हे पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेले आहे. मध्यप्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष देखील राहिले आहेत. सलग सातवेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बैस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून देखील काम पाहिलं आहे.
बैस एक अनुभवी राजकारणी असून, महापालिकेपासून संसदेपर्यंत सर्व स्तरांवर त्यांनी काम केलं आहे. 1980 मध्ये रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सुरुवात करणारे राज्यपाल रमेश बैस यांनी सात वेळा भाजपकडून रायपूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला, पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषविण्याव्यतिरिक्त, एक जायंट किलर म्हणून लौकिक मिळवला.
नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल कसा आहे रमेश बैस यांचा राजकीय प्रवास
1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक
1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य
1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री
1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला
छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. ते सात वेळा खासदार झाले.
मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय
2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल
2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल