नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

1064 0

नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित तांबे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून, 29 हजार 465 मतांच्या फरकानं त्यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे.

विजयोत्सव साजरा करणार नाही 

दरम्यान विजयाची औपचारिक घोषणा बाकी असतानाच सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत आपण विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नसल्याचं सांगितलं आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!