केंद्रीय अर्थसंकल्प 2023: ‘या’ आहेत प्रमूख तरतुदी

625 0

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषणाला 11 वाजता सुरूवात केली सुमारे दीड तास त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण केलं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच, भारताच्या ‘अमृतकाळातलं’ पहिलं अर्थसंकल्पीय भाषण असल्याचे सांगताना भारताच्या 100व्या वर्षाच्या वाटचालीकडे नेणारा हा अर्थसंकल्प असेल असे निर्मला सितारमन म्हणाल्या. तसेच, सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देताना, PM आवास योजना, किसान सम्मान निधी, कोरोना लसीकरण आदींची माहिती सभागृहाला दिली. ग्रामीण महिलांचं सशक्तीकरण, हस्तकलेच्या कलाकारांना बळ, पर्यटनाला प्रोत्साहन आणि ग्रीन ग्रोथ या चार गोष्टी अमृत काळात पुढे जाताना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारचे मिशन सप्तर्षी –

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असताना यंदाचे बजेट हे सात घटकांवर म्हणजे सप्तर्षीवर आधारित असल्याचे स्पष्ट केले.

7 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना सवलत 

7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना या अर्थसंकल्पात सवलत मिळाली असून आता कोणताही कर भरावा लागणार नाही पूर्वी ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत होती.

 

Share This News
error: Content is protected !!