माजी कायदामंत्री शांती भूषण यांचं निधन; वयाच्या 97 वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली: माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि वकील शांती भूषण यांचे मंगळवारी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. भूषण यांनी आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये 1977 ते 1979 या काळात कायदा मंत्री म्हणून काम केले.
मंगळवारी त्यांनी दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माजी कायदा मंत्री शांती भूषण हे वकील प्रशांत भूषण यांचे वडील होते.
शांती भूषण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एका प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावा लागले. तत्पूर्वी, इंदिरा गांधी 1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आणि पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यावेळेची जनसंघाचे त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टात निवडणुकीत गैरव्यवहार करून आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.
