अखेर ठरलं! भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केला सत्यजित तांबे यांना पाठिंबा

713 0

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण, त्याआधी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची यंत्रणा कामाला लागली आहे. 

हातात  एबी फॉर्म असूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखले केला. त्यानंतर महाविकास आघाडीने दुसऱ्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता होती, मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका उघड केली नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. भाजप स्थानिक कार्यकर्त्यांनी तांबे यांचे स्टेटस ठेवले आहेत. मात्र, हा निर्णय पक्षाचा नाही. असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपचा अधिकृतपणे निर्णय आणि आदेश नसला तरी अंतर्गत सूचनांवरून कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!