चिंचवड विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

816 0

पिंपरी-चिंचवड: भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होत असून ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी याकरिता भाजपचे आमदार आणि पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या न या दु:खातून जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय हितचिंतक अद्याप सावरलेले नाही.अल्पावधीत लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत राहीले पाहिजे.

ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्‍यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!