ED

सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह 4 जणांना ईडीनं घेतलं ताब्यात

926 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने कही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून तब्बल 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर आता अमर मुलचंदानीसह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे.

सर्च ऑपरेशन सुरू असतांना घरातच लपून बसलेल्या मुलचंदानीनं मोबाईलमधील बेहिशोबी कर्ज प्रकरणाशी संबधित डेटा डिलीट करून पुरावे नष्ट केले आणि अमर मुलचंदानीला लपवून ठेवण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांनी मदत केल्याची ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रार वरून गुन्हे दाखल करण्यात आले असून रात्री उशीरा अमर मुलचंदानी यांच्या पत्नी आणि 3 भावांसह एका कामगाराला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान आता मुलचंदानीसह या 4 जणांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!