प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना महत्त्वाचा संदेश

647 0

आज ७४ व्या प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय.

राजधानी दिल्लीमध्ये सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरवर्षी या दिवशी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया, असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हटलंय.

Share This News
error: Content is protected !!