Breaking News

पुण्यातील प्राध्यापिका झाल्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

210 0

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. शांतिश्री धुलिपूडी पंडित या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत.

जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे कुलगुरूपद रिक्त झाले होते. आता जगदीश यांच्याकडून पंडित या आज कार्यभार स्वीकारतील. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. मागील 29 वर्षांपासून त्या पुणे विद्यापीठात आहेत.

Share This News
error: Content is protected !!