कोरोना आटोक्यात येतोय ! देशात कोरोनाचे एक लाखांपेक्षा कमी रुग्ण, 895 जणांचा मृत्यू

177 0

नवी दिल्ली- सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे देशात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरताना पाहायला मिळत आहे. जवळपास महिनाभरानंतर प्रथमच आज कोरोनाचे नवीन रुग्ण एक लाखांपेक्षा कमी आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 83 हजार 876 नवे रुग्ण आढळले असून 895 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 99 हजार 54 लोक बरे झाले आहेत. यासह, कोरोनाचा सकारात्मकता दर आता 7.25 टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाचे नवे रुग्ण आल्यानंतर आता देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11 लाख 8 हजार 938 वर गेली आहे, तर आतापर्यंत एकूण 5 लाख 2 हजार 874 जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत असताना आतापर्यंत 169 कोटींचे लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 9 हजार 666 नवे रुग्ण

रविवारी महाराष्ट्रात आणखी 9 हजार 666 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून, एकूण संसर्गाची संख्या 78 लाख 3 हजार 700 झाली आहे, तर 66 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1 लाख 43 हजार 74 वर पोहोचली आहे. एका दिवसात एकूण 25 हजार 175 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 75 लाख 38 हजार 611 झाली आहे. आता राज्यात 1 लाख 18 हजार 76 रुग्ण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. रविवारी राज्यात ओमैयक्रॉन प्रकाराच्या संसर्गाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत 3 हजार 334 रुग्णांना या ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत कोरोनाचे 536 नवीन रुग्ण आढळले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यासह, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 50 हजार 455 आणि मृतांची संख्या 16 हजार 661 वर पोहोचली आहे.

Share This News
error: Content is protected !!