खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीनं घेतला पेट; पुण्यातील कार्यक्रमातील घटना
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांचे दैनंदिन कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू राहणार आहेत. हा कार्यक्रम संपवून त्या बावधनमधील कार्यक्रमालाही गेल्या आहेत.
