Breaking News

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

406 0

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8:12 मिनिटांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालंलता मंगेशकर यांच्या निधना बाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कडून शोक व्यक्त करण्यात येत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत लतादीदींच्या निधनाचं वृत्त ऐकलं, व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. अत्यंत दयाळू स्वभावाच्या, मृदू स्वभावाच्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे.

 

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. येणाऱ्या पिढ्या लता मंगेशकर यांचं एक दिग्गज म्हणून कायमच स्मरण ठेवतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही.

 

आपल्या मधुर आणि कोमल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज ही त्यांची दैवी देणगी होती. अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

Share This News
error: Content is protected !!