पुण्यात निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का ! नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

322 0

पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा आराखडा सादर झाला आणि शहरातील राजकारण तापण्यास सुरू झाली. त्यातच आता शहरातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपाचे काही विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं त्यांच्या त्या विधानावर शिक्कमोर्तब झाल्याचं पाहायला मिळालं

पुणे महापालिकेतील भाजपच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजय सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचा राष्ट्रवादी प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

 

Share This News
error: Content is protected !!