ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यानं व्हेंटिलेटरवर

468 0

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्यावर डॉक्टरांनी दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे.

गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यसाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!