खेळठळक बातम्या

क्रिकेटर ऋषभ पंतच्या कुटुंबीय आणि डॉक्टरांशी बोलणं झालंय; करत जय शाह म्हणाले…..

 

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी जात असताना रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार दुभाजकास धडकल्यानंतर कारने पेट घेतला. सुदैवानं या अपघातातून ऋषभ बचावला. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच सचिव जय शाह यांनी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

“ऋषभ पंतच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. माझं त्याच्या कुटुंबीयांशी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलणं झालंय. ऋषभची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही देखी त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. तसेच त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करू”, अशा आशयाचे ट्वीट जय शाह यांनी केलंय.