जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनाला येताय; तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

409 0

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर संपूर्ण जगात सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार सतर्क झालं असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यात.

याच पार्श्वभूमीवर जेजुरीत खंडेरायाच्या मंदिरात कर्मचारी आणि अधिका-यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. भाविकांना मास्कसक्ती केली नसली तरी कोरोनाच्या नियमांचं पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करण्यात येईल, असंही मंदिर प्रशासनानं सांगीतले आहे.

Share This News
error: Content is protected !!