भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात

454 0

सातारा: भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून ते जखमी झाले आहेत.

त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.माण-खटाव गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाँक्टरांनी सांगितले.

जयकुमार गोरेंच्या प्रकृतीत सुधारणा 

आमदार जयकुमार गोरेची सर्वांची प्रकृती बरी आहे. असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं फेसबुक पोस्ट करत देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!