मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धवठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील हजेरी लावरी आहे.
आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमात उपस्थित न राहिलेल्या रश्मी ठाकरे या अचानक मोर्चात सामील झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ऱश्मी ठाकरे पहिल्यांदा अशा प्रकारे एका जाहीर मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील काळात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लवकरच महिला मुख्यमंत्री मिळेल असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांचे मोर्चात सहभागी होणे, हे महत्त्वाचे मानले जात आहे.