महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत काही फोटो शेअर केले आहेत.
कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून #मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा. pic.twitter.com/tvC3pQgyPz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 14, 2022
मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच जाहिराती असलेल्या बसचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. बोम्मईंनी दिलेली धमकी धुडकावून लावत आ.रोहित पवार बेळगावमध्ये दाखल झाले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा केली होती. आणि आता मुंबईतील हे फोटो शेअर करून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान आज सायंकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात सीमाप्रश्नावर चर्चा होणार आहे.